काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी छेडले जिल्‍हाधिकारी भवनासमोर आंदोलन…

2

विविध मागण्यांसंदर्भात प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर….

सिंधुदुर्गनगरी ता.२१:
राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी भवनासमोर गुरुवारी आंदोलन छेडण्यात आले. राज्यातील  अतिवृष्टी, बँकांची दिवाळखोरी,आर्थिक मंदी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, गुन्हेगारी, ठप्प झालेले उद्योग, आरोग्य व शिक्षण या सह अन्य महत्वपूर्ण समस्यांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, याचे स्मरण करून देण्यासाठी हे आंदोलन करतानाच मोदी सरकारवर टीका करण्यात आली.यावेळी मागण्यांचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
                सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस समिती कार्याध्यक्ष विलास गावडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनात, माजी आमदार पुष्पसेन सावंत,आबा मुंज, चेतन मोंडकर, बी. संदीप, बाळा गावडे, राजू मसुरकर, श्रीकृष्ण तळवडेकर, वकील राघवेंद्र नार्वेकर, महेंद्र सांगीलकर, दादा परब, मंदार शिरसाठ, विजय प्रभू, दिनेश वारंग, आत्माराम सोकटे, उल्हास शिरसाठ, विद्याप्रसाद बांदेकर, इर्शाद शेख मानचेकर, बाळा नामशी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रवेश द्वारावर निदर्शने केल्यानंतर प्रभारी जिल्हाधिकारी यांना काँग्रेस च्या वतीने निवेदन देण्यात आले.

5

4