पुणे येथून गोव्यात रायडिंगसाठी जाणाऱ्या बुलेटची रिक्षाला धडक…

206
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा-वाफोली रस्त्यावर घडला अपघात;रिक्षा चालकासह प्रवासी जखमी…

बांदा ता.२१:
पुणे येथून गोव्यात बुलेट रायडिंगसाठी भरधाव वेगात जाणाऱ्या बुलेटची तीन आसनी रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात रिक्षाचालकासह आतील एक प्रवासी जखमी झाला.
     हा अपघात आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बांदा-वाफोलि रस्त्यावर निमजगा येथील जिल्हा परिषद शाळेजवळ झाला. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जखमींना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केलेत. बुलेट चालकाने आपली चूक मान्य करत रिक्षा चालकाला नुकसान भरपाई दिल्याने ह्द अपघात प्रकरण मिटविण्यात आले. त्यामुळे या अपघाताची नोंद बांदा पोलिसात करण्यात आली नाही.
\