साळगाव-हिंदवी मित्रमंडळाच्या क्रीडा स्पर्धांचा निकाल जाहीर…

119
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कबड्डी स्पर्धेत साई कॉलेज तर हॉलीबॉल स्पर्धेत एस.पी.के,कॉलेज संघ विजेता…

कुडाळ ता.२२:

नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्ग पुरस्कृत व हिंदवी मित्रमंडळ,साळगाव आणि विनायक अण्णा राऊळ महाराज महाविद्यालय,साळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत साई कॉलेज,ओरोस संघ तर हॉलीबॉल स्पर्धेत श्री पंचम खेमराज महाविद्यालय,सावंतवाडी संघ विजेता ठरला.कबड्डी स्पर्धेत विजेत्या संघाला नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्गच्या वतीने आकर्षक चषक व युवा सेना जिल्हाध्यक्ष योगेश धुरी यांच्याकडून तीन हजार रुपये रोख पारितोषिक तसेच हॉलीबॉल स्पर्धेत विजेत्या संघाला नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्गच्या वतीने आकर्षक चषक व कै.कालिदास कुडतरकर-माजी क्रीडाशिक्षक यांच्या स्मरणार्थ,साळगाव ग्रामस्थांच्या वतीने ३००० रुपये रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील दहा संघांनी सहभाग घेतला होता.यात साळगाव कॉलेज संघ उपविजेता ठरला.तसेच वैयक्तिक पारितोषिक,बेस्ट रायडर-अमेय देसाई (बांदा कॉलेज) बेस्ट डिफेंडर-राकेश राऊळ (साळगाव कॉलेज) तर ऑल राऊंडर-परेश वालावलकर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
हॉलीबॉल स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी झाले होते.यात बॅ.खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ले संघ उपविजेता ठरला.तसेच वैयक्तिक पारितोषिकं,बेस्ट मॅसर-सॅम फर्नांडिस (एस.पी.के सावंतवाडी) बेस्ट डिफेंडर-अभिषेक चव्हाण तसेच बेस्ट लिफ्टर-जॉन्टी फर्नांडिस यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभाच्या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.व्ही.व्ही.देसाई,हिंदवी मित्रमंडळाचे सचिव एच.एम.धुरी,अवधूत साळगावकर हे मान्यवर उपस्थित होते.या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये हॉलीबॉल या क्रीडा प्रकारात बंड्या पारकर,राजा पाटकर,संदेश पाटकर,प्रवीण पवार,मानस खानोलकर,सुमुख बिरंबोले,विशाल सावंत,गोलतकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.तर कबड्डी या क्रीडा प्रकारात अजय जाधव,कृष्णा सावंत,भूषण पाटकर,राजू बंगे,शैलेश नाईक,अमोल मराठे,आशिष भोसले,सुमित गावडे,आनंद सूर्यवंशी यांनी पंच म्हणून काम पाहिले.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.याकरिता महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक प्रा सचिन पाटकर यांनी सर्वांचे आभार आणि ऋण व्यक्त केले.

\