रूपेश राऊळ: पडेल उमेदवाराची बडेल वक्तव्ये,प्रमोद जठारांवर टीका….
सावंतवाडी ता.२२:
जिल्ह्यातील भाजप पक्ष स्वाभिमान मध्ये समाविष्ट करण्याची वेळ ज्या प्रमोद जठारांवर आली आहे.खासदार राऊत यांच्यावर बोलणे त्यांना शोभत नाहीज्या नितेश राणेंनी जठारांचा पराभव केला.त्याच राणेंची तळी उचलण्याची वेळ जठारावर आली आहे.ही वस्तुस्थिती आहे,अशी टीका शिवसेनेचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
आमच्या पक्षाच्या नेत्यावर बोलणाऱ्या जठरानी आपली पात्रता ओळखणे गरजेचे आहे.पडीक नेत्यांची बडेल वक्तव्य,असा हा सर्व प्रकार आहे.असाही चिमटा यावेळी राऊळ यांनी काढला.
श्री.राऊळ यांनी आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी शब्बीर मणीयार,उमेश कोरगावकर,चद्रकांत कासार,सागर नाणोसकर,गुणाजी गावडे,योगेश नाईक,सुनिल गावडे,गणेशप्रसाद गवस,महेश शिरोडकर,नारायण राणे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.राऊल म्हणाले,काल कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जठार यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत व संजय राऊत यांच्यावर टीका केली होती.मात्र त्यांची टीका म्हणजे हास्यास्पद आहे.ज्या जठार यांनी एकेकाळी आहे.ज्या राणेंनी यांच्या विरोधात निवडणूक लढवून पराभव केला.त्याच राणे यांच्या बरोबर राहून त्यांना आपली तळी उचलावी लागत आहे.हे दुर्दैव आहे.जठार यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या विरोधात बोलताना विचार करावा,अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही.गरज सरो वैद्य मरो ही प्रवृत्ती आमची नाही.असाही टोला त्यांनी लगावला.
आगामी काळात होणाऱ्या बांदा ग्रामपंचायतीसाठी मकरंद तोरसकर व साई काणेकर तर आंबेगावसाठी वर्षा परब व सविता नाईक असे अर्ज आले आहेत.त्यामुळे याची अधिकृत घोषणा उद्या करण्यात येईल,सावंतवाडी नगराध्यक्षासाठी तब्बल दहा ते बारा इच्छुक आहेत.मात्र कोणाला उमेदवारी द्यावी या बाबतचा निर्णय शिवसेनेचे नेते दीपक केसरकर घेणार आहेत.असेही त्यांनी यावेळी सांगितले.