२५ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची मुदत…
बांदा.ता,२२: बांदा सरपंच पोटनिवडणुकीमध्ये आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. यावेळी एकाही अर्जावर आक्षेप न घेतल्याने सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणपत लोंढे यांनी दिली.
बांदा सरपंच पदासाठी ८ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे. या निवडणूकीसाठी एकूण सात उमेदवार निवडणूक रिंगणात अाहेत. भाजपकडून ३, शिवसेनेतून २, काँग्रेसकडून १ तर एक अपक्ष उमेदवार आहे. सोमवार २५ नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. याच दिवशी संध्याकाळी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आज सर्व उमेदवारांनी इच्छुक चिन्हांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडे दिली आहे.
यावेळी उमेदवार साईप्रसाद कल्याणकर, श्रीप्रसाद गोवेकर, मकरंद तोरस्कर, साईप्रसाद काणेकर, डॅनी आल्मेडा, संतोष सावंत, अक्रम खान यांच्यासह शहरातील शिवसेना, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.