सावंतवाडी पर्यटन महोत्सव डिसेंबर ऐवजी मे महिन्यात……

362
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पालिका सभेत निर्णय: ओला दुष्काळ नगराध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय…

सावंतवाडी.ता,२२:

येथील पालिकेच्या माध्यमातून घेण्यात येणारा सावंतवाडी पर्यटन महोत्सव तब्बल चार ते पाच महिने लांबला आहे.आज झालेल्या बैठकीत हा महोत्सव डिसेंबर ऐवजी मे महिन्यात घेण्यात यावा असा निर्णय एकमताने घेण्यात आला. सावंतवाडी पालिकेची मासिक सभा आज झाली. यावेळी महोत्सवावर चर्चा झाली.ओला दुष्काळ,अवकाळी पाऊस आणि नगराध्यक्ष पदाची पोट निवडणूक अशा अनेक तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी उपस्थितांकडुन करण्यात आली. याला सर्वांनी समर्थन दिले.
दरम्यान शासनाने पर्यटन महोत्सव सारख्या कााकरमणूकीच्या कार्यक्रमाला फक्त ५० हजार रुपयाची तरतूद केली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे महोत्सव कसे करावेत असा प्रश्न भाजपचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी सभागृहात उपस्थित केला.
यावेळी सुधीर आडिवरेकर, भारती मोरे, माधुरी वाडकर, दिपाली भालेकर, समृद्धी विरनोडकर, शुभांगी सुकी, उत्कर्षा सासोलकर, दिपाली सावंत,आनारोजीन लोबों, जयेंद्र परुळेकर, परिमल नाईक, बाबू कुडतरकर, राजू बेग आदीं नगरसेवक या चर्चेसाठी सहभागी झाले.

\