त्यांचा तो वैयक्तिक राजकीय निर्णय:पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून ट्वीट
मुंबई ता.२३: अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी पक्षाचा पाठिंबा नाही.तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीशी बंड करून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी भाजपशी संधान साधण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
राष्ट्रवादीत फूट पाडून अजित पवार यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता पुढची राजकीय समीकरणे कशी काय घडतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान त्यांच्यासोबत पंधरा ते वीस आमदार असल्याचे वृत्त आहे.