राणेंच्या माध्यमातून सिंधुदुर्गला पुन्हा एकदा नेतृत्व मिळेल

428
2
Google search engine
Google search engine
Google search engine

महेश सारंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले अभिनंदन

सावंतवाडी ता.२३: सिंधुदुर्ग जिल्हा गेली पाच वर्षे राणेंच्या नेतृत्वासाठी तरसला होता,ते नेतृत्व पुन्हा एकदा जिल्ह्यात प्रस्तापित होईल,असा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.महाराष्ट्रात युती सरकारने घवघवीत यश प्राप्त केले होते.मात्र सत्तेवर लाथ मारून शिवसेनेने आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला होता.तो प्रयत्न भाजपाने उधळून लावला,असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.दरम्यान उपस्थितांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

यावेळी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर,स्वाभिमान पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष संजू परब,मनोज नाईक,सुधीर आडिवरेकर,दादू कविटकर,परीमल नाईक,दिलीप भालेकर,परिणीता वर्तक,धनश्री गावकर,मंदार कल्याणकर आदी उपस्थित होते.

श्री.सारंग पुढे म्हणाले,जिल्ह्यात स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन झाल्यामुळे मोठी ताकद मिळाली आहे.आणि या शक्तीच्या जोरावरच आम्ही जिल्ह्यात भाजपाचे स्थान वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याला राणेंच्या माध्यमातून युवा नेतृत्व मिळण्याची शक्यता आहे.आणि ते मिळेलही असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी श्री.परब म्हणाले,सत्य काय असते हे आताच्या मंत्रिमंडळ स्थापनेतून जनतेच्या समोर आलेच असेल,विजय हा नेहमी सत्याचाच होतो आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत,असे त्यांनी सांगितले.दरम्यान जिल्ह्यात भाजप पक्षवाढीसाठी आमचे सगळे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.आणि नक्कीच पुढच्या पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा भाजपमय करू,असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

\