ज्या ठीकाणी राणे…त्या ठीकाणी यश..हे पुन्हा एकदा सिद्ध…

2

विशाल परब यांचा दावा;जिल्ह्याला आता पुन्हा एकदा गतवैभव मिळणार…

सावंतवाडी.ता,२३:
माजी मुख्यमंत्री नारायण राणे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी विजय निश्चितच आहे. हे आता पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राणे काँग्रेसमध्ये गेले त्याठिकाणी यश मिळाले आता ते भाजपात गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी सुद्धा यश मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गेले काही दिवस टीका करणाऱ्यांना जोरदार चपराक मिळाली आहे.असा दावा भाजपाचे युवा नेते विशाल परब यांनी आज केला.
      भाजप व राष्ट्रवादीचा शपथविधी झाल्यानंतर श्री परब यांनी आपली प्रतिक्रिया ब्रेकिंग मालवणीला दिली ते म्हणाले गेले अनेक दिवस सरकार स्थापन करण्याबाबत मतमतांतरे होती मात्र केंद्रातील नेते नरेंद्र मोदी अमित शहा यांच्या सुबक कल्पनेतून स्थिर सरकार स्थापन करण्यास यश मिळाले आहे. यात माजी मुख्यमंत्री राणे यांचा वाटा महत्त्वाचा आहे. जिल्ह्यात त्याचा फायदा होणार आहे.आमदार नितेश राणे यांना सुद्धा मंत्रीपद मिळणार आहे.त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा येत्या काळात जिल्ह्यातला होईल आणि विकासात पाठीमागे राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

5

4