अजित पवारांचे “बंड” फसल्यात जमा…

656
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सात आमदार पुन्हा माघारी;पुढचा निर्णय राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर…

मुंबई ता.२३:

आपल्यासोबत तब्बल ११ आमदार घेऊन उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या तसेच भाजपासोबत जाणाऱ्या माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे बंड फसल्यात जमा आहे.त्यांच्यासोबत असलेले धनंजय मुंडे यांच्यासह सात आमदार पुन्हा माघारी राष्ट्रवादीत फीरल्यामुळे तूर्तास तरी ही परिस्थिती निर्माण झाली आहे.आता सहा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीची बैठक होणार आहे.त्यानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.
दरम्यान आपले भाऊ श्रीनिवास पवार यांच्या घरी ठाण मांडून बसलेल्या अजित पवार यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते त्याठिकाणी गेल्याचे वृत्त आहे.तसेच त्यांची बहीण सुप्रिया सुळे यासुद्धा अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.त्यामुळे आता अजित पवार नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.दरम्यान कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेसह काँग्रेसचे आमदार अन्य ठिकाणी हलवण्याबाबत दोन्ही पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत.तर राष्ट्रवादीचे आमदार मुंबई सोडून बाहेर जाऊ नयेत यासाठी राष्ट्रवादीसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विमानतळावरील गेट नंबर ८ च्या ठिकाणी गराडा घातला आहे.

\