माणगाव येथील घटना:किरकोळ दुखापत,गाडीचे नुकसान
माणगाव/मिलिंद धुरी, ता.२४: चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात माणगाव येथील शिक्षक व पत्रकार भरत केसरकर हे जखमी झाले आहेत.यात कारचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.हा अपघात काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास माणगाव बाजारपेठ परिसरात घडला.ते केरवडे येथे नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते,तेथून परतत असताना ही घटना घडली.
या अपघातात त्यांच्या डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली आहे.त्यांना उपचारासाठी खाजगी रूग्णालयात मध्ये दाखल करण्यात आले.सुदैवाने चालकाला व गाडीत असलेल्या दोन लहान मुलांना कोणतीही दुखापत झाली नाही.अपघात झाल्याचे कळताच माणगाव बाजारपेठेतील ग्रामस्थांनी तात्काळ त्याठिकाणी धाव घेत त्यांना सहकार्य केले.