बिबट्याच्या कातड्याची तस्करीत प्रकरणी देवगड येथील एक ताब्यात

2

सिंधुदुर्गनगरी ता.२४: बिबट्याच्या कातड्याची तस्करी केल्याप्रकरणी देवगड येथील एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी जोगेश्वरी उपनगरी येथून ताब्यात घेतले.ही कारवाई काल रात्री गुन्हा शाखेच्या पथकाकडून करण्यात आली.जप्त करण्यात आलेल्या कातड्याची किंमत सुमारे दहा लाख रुपये इतकी आहे.
अवैधरित्या बिबट्याच्या कातडीची विक्री होणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती.त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेच्या विभागाने जोगेश्वरीच्या उपनगरी सहकार रोडवर सापळा रचून संशयास्पद रित्या फिरत असलेल्या ३८ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले.पोलिसांना त्याच्या पिशवीत बिबट्याची कातडी सापडली.त्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम, १९७२ अन्वये त्याला अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील रहिवासी असलेल्या सदरच्या संशयीताने पोलिसांना सांगितले की तो बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्यासाठी मुंबईला आला होता.या कातड्याची किंमत दहा लाख रुपये आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता ३० नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.संबंधित संशयिताची मुंबई पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

11

4