रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत वि. म. कोकिसरे नारकरवाडी शाळेला सुयश….

2
वैभववाडी ता,२४:
     रंगोत्सव सेलिब्रेशन मुंबई या संस्थेच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील कला स्पर्धेत वि.म.कोकिसरे नारकरवाडी शाळेने उज्वल यश संपादन केले आहे.
     संस्थेच्यावतीने विदयार्थ्यांना विविध कलाप्रकाराची आवड निर्माण व्हावी.व त्यांना त्यांच्या अंगी असलेले कौशल्य दाखविण्याची संधी मिळावी.यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत रंगकाम, हस्ताक्षर, व्यंगचिञ, ग्रिटींग कार्ड बनविणे अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.
     कोकिसरे नारकरवाडी शाळेतील विदयार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.कलरिंग या स्पर्धेत वैष्णवी विश्वनाथ चव्हाण, हिने आर्ट मिरीट ट्राॕपी व ग्रेटींग मेकींगमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.तर ओम संतोष कोलते, स्वरांजली प्रसाद पवार, ब्रिजेश संदेश तुळसणकर, वैष्णवी सौमिञ प्रभु, सुहेल शब्बीर काझी, पार्थ पंडीत पवार, या विदयार्थ्यांना कलरिंग कला प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.
     स्पर्श चिञसेन होळकर, तन्वी अनिल सुर्यवंशी, यश ज्ञानदेव पवार, यांना काॕलाज या कला प्रकारात तर तन्वी अनिल सुर्यवंशी, प्रेम प्रदीप तांबे, यांना व्यंगचिञ प्रकारातील व स्वरांजली प्रसाद पवार, हीला ग्रेटींग मध्ये सुवर्णपदक, व गिफ्ट मिळाले आहे.
     या सर्व विदयार्थ्यांना मुख्याध्यापक संजीवकुमार शेटये, कला शिक्षिका संपदा बागी, ज्योती पवार, समिर सरवणकर यांचे मार्गदर्शन लाभले.
चौकट-
मुख्याध्यापक संजयकुमार शेटये यांना द्रोणाचार्य पुरस्कार व संपदा बागी यांना कला गौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
     शाळेच्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समिती नारकरवाडी, पालक, ग्रामस्थ, पं.स.वैभववाडी यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

6

4