Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याअजितदादांनी स्वगृही परत यावे....

अजितदादांनी स्वगृही परत यावे….

रोहित पवारांचे आवाहन;कौटुंबिक आठवणींना उजाळा…

मुंबई.ता,२४: राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना उद्देशून फेसबुकवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अजितदादांनी शरद पवारांचे निर्णय मान्य करुन स्वगृही परत यावे, असे आवाहन या पोस्टमधून रोहित यांनी केले आहे.रोहित पवार यांच्या पोस्टमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार आणि रोहित पवार या चौघांचा एकत्र असलेला फोटो आहे. त्याचबरोबर कौटुंबिक आठवणी रोहित यांनी शेअर केल्या आहेत.
‘लहानपणापासून साहेबांना पहात आलो, प्रश्न राजकीय असो की कौटुंबिक साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत.आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते.अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमिका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकिय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही. आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं.
अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत व स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत,पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती “पवार साहेब’’ होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो व अखेरपर्यन्त लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटूंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत रहायला हवं. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिशः वाटतं,असे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments