सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने “पाणी टंचाई”

2

सावंतवाडी ता.२४: शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईन फुटल्यामुळे शहरातील काही भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.दरम्यान उद्या सकाळ पर्यंत हा तांत्रिक बिघाड दूर करण्यात येणार आहे.अशी माहिती पालिकेचे पाणीपुरवठा योजनेचे अभियंता भाऊ भिसे यांनी दिली.
येथील जिमखाना परिसरात ही पाईपलाईन फुटली आहे.त्यामुळे संध्याकाळच्या सत्रात तेथून पाणीपुरवठा झालेला नाही.मुख्य पाईपलाईन मध्ये बिघाड झाल्यामुळे युद्धपातळीवर तो दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.सकाळ पर्यंत हा बिघाड दूर करण्यात यश निश्चितच मिळेल,असा विश्वास भिसे यांनी व्यक्त केला.मात्र अचानक पाणीटंचाई झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

8

4