Tuesday, March 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यानुकसानग्रस्तांना शासनाने तत्काळ हेक्टरी २५ हजाराची मदत द्यावी...

नुकसानग्रस्तांना शासनाने तत्काळ हेक्टरी २५ हजाराची मदत द्यावी…

तालुका शिवसेनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन सादर…

मालवण, ता. २५ :

जिल्ह्याला क्यार, महाचक्रीवादळाचा बसलेला फटका तसेच अतिवृष्टी मुळे शेतकरी, बागायतदारांसह मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शासनाकडून तत्काळ नुकसानग्रस्तांना हेक्टरी २५ हजाराची नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देईल, असा इशारा तालुका शिवसेनेने दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार अजय पाटणे यांना सादर केले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहर प्रमुख बाबी जोगी, महिला आघाडी तालुका समन्वयक पुनम चव्हाण, नगरसेवक मंदार केणी, पंकज सादये, अनंत पाटकर, सुनिता जाधव, आकांक्षा शिरपुटे, तुप्ती मयेकर, नीलम शिंदे, रश्मी परुळेकर, विद्या फर्नांडीस, सन्मेश परब, महेश मेस्त्री, यशवंत गावकर, भगवान लुडबे, उमेश मांजरेकर, पाॅली गिरकर, राजू मेस्त्री, नंदु गवंडी, श्याम झाड, स्वप्निल आचरेकर, बाबा चव्हाण, दिपक देसाई, भाई कासवकर आदी उपस्थित होते.
राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेली हेक्टरी आठ हजाराची नुकसान भरपाई ही तुटपुंजी आहे. त्यात वाढ करून किमान २५ हजार हेक्टरी मदत मिळावी, मच्छीमार बांधवांसाठी नुकसानीची तरतूद व्हावी, सोसायट्यांकडून घेतलेले शेती व खावटी कर्ज माफ करण्यात यावे, शेतकरी सन्मान योजना व पीक विम्याचे पैसे त्वरित मिळावेत या मागणीसाठी तालुका शिवसेनेच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments