बांदा सरपंच निवडणुकीत होणार तिरंगी लढत

2

चौंघाची माघार:तोरसकर,खान आणी कल्याणकर रिंगणात

बांदा.ता,२५:
बांदा थेट सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत आज नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने तिरंगी लढत निश्चित झाली आहे. भाजपचे अक्रम खान, शिवसेनेचे मकरंद तोरस्कर व अपक्ष उमेदवार साईप्रसाद कल्याणकर यांच्यात लढत होणार आहे.
सरपंच निवडणुकीसाठी एकूण ७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीत सातही अर्ज वैध ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपचे अधिकृत उमेदवार अक्रम खान असल्याने संतोष सावंत यांनी सकाळी ११ वाजता आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार मकरंद तोरस्कर असल्याने साईप्रसाद काणेकर व डॅनी आलमेडा यांनी दुपारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.
काँग्रेसचे श्रीप्रसाद गोवेकर यांनी देखील दुपारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे रिंगणात तीन उमेदवार राहिल्याने सरपंचपदासाठी तिरंगी लढत होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने उमेदवारांना प्रचारासाठी १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी गणपत लोंढे यांनी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले. अक्रम खान यांना कपबशी, मकरंद तोरस्कर यांना कपाट तर साईप्रसाद कल्याणकर यांना नारळ चिन्ह वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामविस्तार अधिकारी डी. एस. अमृतसगर उपस्थित होते.

2

4