देशात सातव्या आर्थिक जनगणनेला २६ नोव्हेंबर पासून सुरवात…

153
2
Google search engine
Google search engine
Google search engine
ओरोस ता.२५:
केंद्र शासनाच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय यांच्या मार्फत सातवी आर्थिक जनगणना 26 नोव्हेंबर पासून पूर्ण देशात करण्यात येत आहे. यामध्ये निवासी, निवासी व व्यापारी तसेच व्यापारी अशा तीन विभागात ही गणना होणार आहे. पुढील तीन महीने फेब्रुवारो 2020 पर्यंत गणनेचे काम सुरु राहणार आहे. जिल्हास्तरावर याचा प्रारंभ मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी प्रभारी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याहस्ते सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हा सांख्यिकी अधिकारी अभिजीत कुलकर्णी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
        यावेळी आपले सरकार सेवा केंद्र जिल्हा व्यवस्थापक प्रसाद जाधव, जिल्हा सांख्यिकी विभाग संशोधक भालचंद्र ठाकुर, प्रणवकुमार इनामदार, सिद्धेश गावडे आदी उपस्थित होते.  सहावी जनगणना 2014 मध्ये झाली असून यावेळी 61 लाख 37 हजार आस्थापनांची गणना करण्यात आली होती. यात 1 कोटी 45 लाख 12 हजार व्यक्ती या आस्थापनांवर रोजगार घेत असल्याचे निष्पन्न झाले होते. सातवी जनगणना उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्येक्ष घरोघरी कुटुंबास तसेच उद्योगास भेट देवून करण्यात येणार आहे. हे काम आपले सरकार सेवा केंद्र यांनी नियुक्त केलेल्या प्रगणकांकडून केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यासाठी 661 प्रगणक नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यावर 380 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी कुलकर्णी यांनी दिली.
     यावेळी पुढे बोलताना कुलकर्णी यांनी, यावेळी प्रथमच आर्थिक जनगणना पेपरलेस होत आहे. यासाठी खास सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून मोबाईलद्वारे ही गणना होणार आहे. नियुक्त प्रगणक यांनी केलेल्या गणनेची 100 टक्के छाननी करण्यात येणार आहे. हे वैधतीकरण आपले सरकार सेवा केंद्र नियुक्त पर्यवेक्षक करणार आहेत. 10 टक्के प्रगणकांच्या कामाचे दुसऱ्या स्तराचे पर्यवेक्षण केले जाणार आहे. त्यातील 2 टक्के पर्यवेक्षण राष्ट्रीय नमूना पाहणी संघटना क्षेत्रीय कार्य विभागाचे उपमहासंचालक करणार आहेत. तर 8 टक्के पर्यवेक्षण अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील नेमलेल्या पर्यवेक्षका मार्फत केले जाणार आहे, असे यावेळी कुलकर्णी म्हणाले.
\