अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी एकाला पोलीस कोठडी…

137
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवलीतील घटना; संशयित कर्नाटकमधील,काल झाली होती अटक…

ओरोस ता.२५:
कणकवली तालुक्यातील करंजे तेलीवाडी येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मारप्पा हेडगे रा.महमदापुर गोकाक कर्नाटक याला जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी २९ नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी अभियोक्ता संदेश तायशेटे यांनी सरकारी पक्षाच्यावतीने काम पाहिले.
    कणकवली शिवशक्तिनगर येथील एका १५ वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आईने पोलिसांत दिल्यानंतर तिने व्यक्त केलेल्या संशयित युवकाचा शोध घेत पोलिस कर्नाटक राज्यातील कोकाक तालुक्यातील एका गावात पोहोचले. शनिवारी त्या युवकाच्या घरातून त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिची रवानगी बाल सुधारगृहात केली. मात्र, संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात आला नव्हता.रविवारी त्या मारप्पा हेगडे नामक तरुणाला कणकवली पोलिसांच्या हवाली नातेवाईकांनी केले.
      कणकवली पोलिसांत मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करीत ताब्यात घेतले होते. सोमवारी त्याला जिल्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी त्याला 29 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
\