महिलेच्या पर्समधील ५ हजाराची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविली…

2

बांदा येथील घटना ; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल…

बांदा ता.२५:
 बांदा बसस्थानकावर एसटीत चढताना महिलेच्या पर्समधून ५ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. बांदा – गडगेवाडी येथील राजश्री राजेंद्र देसाई (वय- ४३) यांना एसटीत तिकीट काढतेवेळी पर्समधून पैसे चोरीस गेल्याचे लक्षात आले. बांदा पोलीसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
     याबाबत बांदा पोलीसांकडून प्राप्त झालेली अधिक माहिती अशी की, राजश्री देसाई या ओरोसला जाण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजता बांदा बस स्थानकावर आल्या होत्या. पणजीतून ओरोसकडे जाणार्‍या बसमध्ये त्या चढल्या. तिकीट काढण्यासाठी पर्स उघडली असता आतील ५ हजार रुपये व घराची चावी चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबतची तक्रार बांदा पोलीसांत दाखल केली आहे. अज्ञात चोरट्या विरोधात बांदा पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हेड काँस्टेबल पी. एस. पवार करीत आहेत.

1

4