रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत व्ही.एन.नाबर इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांचे यश…

145
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा ता.२६:

कामत चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील व्ही.एन. नाबर इंग्लिश मिडीयम प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव सेलिब्रेशन स्पर्धेत भरघोस यश संपादन केले. नॅशनल लेव्हल आर्ट कॉम्पिटिशन मुंबई यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतातून ४ लाख विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले होते.
प्रशालेच्या ४ विद्यार्थ्यांना आर्ट मेरिट ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. २४ विद्यार्थी सुवर्णपदकाचे मानकरी ठरले तर २ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत अधिराज गवळे, निनाद कळंगुटकर, दर्शील राऊळ, मितेश मयेकर, चिराग सावंत, विहान अधिकारी, श्रावणी गवस, मिताली कोकाटे, सोहम सातार्डेकर, नंदिनी गावकर, पंखुडी कावले, निहारिका धुरी, योगेश चव्हाण, युती राऊळ, नमीरा खतीब, सुजैन खतीब, दीक्षा वरख, शुभम शिरोडकर, दीप्ती धुरी, सेजल परब, वेदांकी गवस, अंकुश धामापूरकर, जितेंद्र चौधरी, अश्विनी गावकर, सेजल सावंत, अंतरा धुरी या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कला शिक्षक अमित कुबडे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनाली देसाई यांना द्रोणाचार्य पुरस्कार सन्मानचिन्ह तर अमित कुबडे यांना कलागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेच्या यशाबद्दल प्रशालेला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मंगेश कामत, शिक्षक-पालक संघाच्या उपाध्यक्षा अमृता महाजन, मुख्याध्यापिका मनाली देसाई, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

\