जयेंद्र परूळेकरांची माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता सावंतवाडीत टीका….
सावंतवाडी ता.२६:
आमच्याकडे आमदार बळ आहे,प्रसंगी आम्ही ते बाजारातून विकत घेऊ,असे सांगणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला,अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे भाजपाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव घेता केली.आजच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर
देशात लोकशाही आजही जिवंत आहे,संविधानात ती ताकद आहे.आज संविधान दिना दिवशीच त्याचा प्रत्यय लोकांना आला,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी अण्णा केसरकर,बाबू कुडतरकर, शुभांगी सुकी,भारती मोरे,सुरेंद्र बांदेकर, प्रेमानंद देसाई आदी उपस्थित होते.
यावेळी परुळेकर म्हणाले,सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपाकडून झालेल्या घोडेबाजारा नंतर बाजारात आमदार आहेत.आम्ही ते विकत घेऊ,असा दावा राणेंनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता.याला श्री.परूळेकर यांनी प्रत्युत्तर दिले.ते म्हणाले,लोकशाहीत अशा प्रकारचा दावा करणे चुकीचे आहे.मात्र दुर्दैवाने तो करण्यात आला,परंतु देशाच्या संविधानाने आज त्यांना आपली ताकद दाखवून दिली.