वैभववाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन उद्यापासून….

92
2
Google search engine
Google search engine
Google search engine
वैभववाडी ता.२६:
     वैभववाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. २७ ते २९ नोव्हेंबर या कालावधित कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालय याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
     या प्रदर्शनाचे उदघाटन २७ रोजी १० वा. होणार आहे. दु. २ वा. निबंध स्पर्धा, दि. २८ रोजी सकाळी १० वक्तृत्व स्पर्धा लहानगट, दु. २ वा. वक्तृत्व स्पर्धा मोठागट, दि. २९ रोजी सकाळी १० वा. प्रश्नमंजूषा  स्पर्धा मोठागट, दु. १२ वा. प्रश्नमंजूषा लहानगट, दु. २ वा. बक्षिस वितरण व समारोप समारंभ होणार आहे. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटशिक्षण अधिकारी मारुती थिटे यांनी केले आहे.
\