कोकण परिक्षेत्रीय ४६ व्या पोलिस क्रिडा स्पर्धांना सुरुवात

117
2
Google search engine
Google search engine
Google search engine
ओरोस ता.२६:
४६ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलिस क्रिडा स्पर्धेतील वेगवेगळ्या प्रकरातील पुरुष व महिला क्रिडा प्रकारातील
स्पर्धेला २५ नोव्हेंबर रोजी येथील पोलिस परेड ग्राउंड व जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरुवात झाली आहे.
उंचउडी या प्रकारात सिंधुदुर्ग जिल्हयातील सिद्धेश चिपकर याने प्रथम क्रमांक तसेच रायगडच्या रितेश
यादव याने द्वीतीय क्रमांक पटकावला. हातोडा फेक या प्रकारात ठाणे ग्रामिणच्या हेमराज भिवरे याने व संतोष
तायडे यांनी अनुक्रमे प्रथम व द्वीतीय क्रमांक पटकावला.
     आजच्या पहिल्या दिवसात पहिल्या सत्रामध्ये अॅथलेटीक्स क्रिडा प्रकारात पुरुष विभागात १० हजार कि.मी या क्रिडा प्रकारात रत्नागिरी जिल्हयातील किरण गरुड याने प्रथम क्रमांक तर नवी मुंबईच्या तुषार पवार याने द्वीतीय क्रमांक पटकवला. ११० मिटर अडथळा शर्यत मध्ये रायगडच्या करण कृष्णा पाटील याने प्रथम क्रमांक तर रत्नागिरीच्या रोहित मांगले याने द्वीतीय क्रमांक पटकवला.
पुरुष सांघिक फुटबॉल क्रिडा प्रकारात सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी यांनी सामन्यांमध्ये विजय
नोंदविलेले आहेत. पुरुष सांघिक हॉकी क्रिडा प्रकारात सिंधुदुर्ग, नवी मुंबई यांचे संघ विजयी झाले असुन
रायगड व पालघर यांचेतील सामना बरोबरीत संपला. पुरुष सांघिक खोखो क्रिडा प्रकारात पालघर, सिंधुदुर्ग,
रायगड यांनी विजय नोंदविले आहेत. पुरुष सांघिक हॅण्डबॉल क्रिडा प्रकारात सिंधुदुर्ग, नवी मुंबई, रत्नागिरी या
संघानी विजय मिळविला.
बॉक्सींग पुरुष क्रिडा प्रकारात ४९ किलो वजनी गटात रायगडचा अर्चित भोगवकर, ५६ किलो वजनी
गटात रायगडचा अंकुश पोळे , ६० किलो वजनी गटात उमेश पाटील, रत्नागिरी, ६४ किलो वजनी गटात
सलमान पाटवे, ठाणे जिल्हा, ६९ किलो वजनी गटात राहुल पाटील, रत्नागिरी, ७५ किलो गटात स्वप्नील लोहार,
नवी मुंबई, ८१ किलो वजनी गटात अभिजीत निकम, नवी मुंबई, ९१ किलो गटात प्रविण घोटीकर, नवी मुंबई, व
खुल्या गटात जावेद मुल्ला, ठाणे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
            महिला विभागात १०० मिटर अडथळा शर्यत मध्ये रत्नागिरीच्या शितल पिंजरे हिने प्रथम तर नवी
मुंबईच्या संध्या पार्टे हिने द्वीतीय क्रमांक पटकावला. महिला सांघिक हॉलीबॉल क्रिडा प्रकारात सिंधुदुर्ग, नवी मुंबई, रत्नागिरी यांनी विजय नोंदविले. महिला सांघिक बास्केटबॉल क्रिडा प्रकारात सिंधुदुर्ग, नवी मुंबई, रत्नागिरी यांनी विजय मिळविले. महिला
सांघिक खोखो क्रिडा प्रकारात नवी मुंबई, पालघर, रायगड यांनी हे विजयी झाले.
बॉक्सींग महिला क्रिडा प्रकारात ४८ किलो गटात मिनाक्षी लोखंडे, रायगड, ५१ किलो गटात तेजस्वी
ढोके. नवी मुंबई, ५४ किलो गटात समिना पटेल, रायगड, ५७ किलो गटात श्वेता जाधव नवी मंबई. ६०किलो
गटात अर्चना पाटील, नवी मुंबई, ६४ किलो गटात ज्योती मरसाळे, नवी मुंबई, ६९ किलो गटात दिपाली मोरे,
रायगड, ७५ किलो गटात प्राची शेळके, रायगड, किलो गटात रेश्मा दुपल, रायगड यांनी प्रथम क्रमांक
पटकावला
विजयी संघाच्या खेळाडूंचे व वैयक्तिक स्पर्धा विजेते यांचे जिल्हा पोलीस अधाक्षक  दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक
तुषार पाटील यांनी अभिनंदन केले.
\