बांदा आरोग्य केंद्रात माकडताप प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ……

2

बांदा ता.२६:
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात माकडताप प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. यावर्षातला बूस्टर डोस यावेळी देण्यात आला.
३ वर्षांपूर्वी बांदा परिसरात माकडतापाने धुमाकूळ घातला होता. या तापाने बांदा शहरातील सटमटवाडी व परिसरातील गावांमधील १५ हुन अधिक जणांचे बळी घेतले होते. त्यामुळे दरवर्षी आरोग्य विभागाच्या वतीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १४ गावांमध्ये माकडताप प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येते.
यावर्षी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य राखी कळंगुटकर, आरोग्य सहाय्यक एच. एच. खान, परिचारिका टी. ई. चव्हाण आदी उपस्थित होते. बांदा शहर, इन्सुलि, नेतर्डे, कास, शेर्ले, मडुरा, रोणापाल, पाडलोस, डिंगणे डोंगरपाल, गाळेल, क्षेत्रफळ सातोसे, निगुडे या गावांमध्ये टप्प्याटप्प्याने ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.
माकडताप बाधित वरील सर्व गावातील जनतेने माकडताप प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे. तसेच काजू हंगाम सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांनी काजू बागेत किंवा जंगलात जाताना अंगाला डीएमपी तेल लावून जावे व दूषित गोचिडींचा प्रादुर्भाव रोखवा असे आवाहन यावेळी डॉ. पाटील यांनी केले.

2

4