आता कस वाटतंय गार गार वाटतंय !

355
2
Google search engine
Google search engine
Google search engine

भाजपा सरकार गडगडताच पटवर्धन चौकात शिवसैनिकांनी केला जल्लोष

कणकवली, ता.२६ :
सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथी घडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यानी राजीनामा दिल्याने भाजपा सरकार केवळ चार दिवसातच गडगडले. या पार्श्वभूमीवर कणकवली येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा करत एकच जल्लोष केला.तसेच आता कस वाटतंय …गार गार वाटत,येऊन येऊन येणार कोण महाविकास आघाडी शिवाय आहे कोण ! अशा जोरदार घोषणाबाजी करत फटाके फोडले.
                 महाराष्ट्रात गेल्या महीनाभरापासुन सुरु असलेल्या राजकीय घडामोडींनी आज वेगळेच वळण घेतले. आठ दिवसापुर्वी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणुन शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसेनला तोडीस तोड उत्तर देत विजयाचा आनंद साजरा केला होता. मात्र हाही आनंद केवळ चारच दिवस टिकल्याने पुन्हा एकदा भाजपाला खिजवत शिवसेनेने आज कणकवलीत आनंदोत्सव साजरा केला.
कणकवली येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात शिवसेना कार्यकर्ते एकवटले होते. यावेळी सेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमेकाला शुभेच्छा देत महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असल्याने आनंदोत्सव साजरा केला. आप्पासाहेब पटवर्धन चौकात घोषणाबाजी करत व फटाके फोडत आणि मिठाई वाटत विजयोत्सव साजरा करण्यात आला.
      यावेळी तालुका प्रमुख शैलेश भोगले,राजू शेट्ये,संदेश पटेल,नगरसेवक सुशांत नाईक,रुपेश नार्वेकर,कन्हैया पारकर,अँड.हर्षद गावडे,शेखर राणे,विलास कोरगावकर,प्रमोद मसुरकर,विलास गुडेकर,रुपेश आमडोस्कर,अनुप वारंग,समीर पारकर,संतोष पुजारे,श्री. घाडीगावकर,तेजस राने,रमेश चव्हाण,राजन म्हाडगूत आदी पदाधिकारी व  शिवसैनिक .
\