कणकवली शहरवासीयांतर्फे शहिदांना आदरांजली

2

कणकवली, ता.२६:  मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात अनेक जवान शहीद झाले. तसेच अनेक नागरिकही मृत्यूमुखी पडली. या सर्वांना आज कणकवली पोलिस ठाणे आवारात कणकवलीकरांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली.

26/11 च्या निमित्ताने मेणबत्ती प्रज्वलित करून वंदे मातरमची प्रतिकृतीही पोलिस ठाणे आवारात साकारण्यात आली होती. यावेळी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, पोलिस निरीक्षक तथा माजी सैनिक अधिकारी शिवाजी कोळी यांच्यासह अशोक करंबेळकर, बाळू मेस्त्री, डॉ.बिरमोळे, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, कन्हैया पारकर, नितीन पटेल, हनिफ पिरखान , सादिक कुडाळकर, बंटी तहसीलदार, महानंदा चव्हाण, हेमंत सावंत, पंकज दळी, रवींद्र मुसळे, दादा कुडतरकर तसेच अनेक नागरिक उपस्थित होते. कवयित्री सरिता पवार यांनी उपस्थितांना संविधानाची शपथ दिली.

2

4