शहरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा….

2

संजू शिरोडकर;डास निर्मुलन करण्यासाठी पालिकेने पुढाकार घ्यावा….

सावंतवाडी ता.२७:

शहरातमोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा,तसेच वाढत चाललेले डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी डास निर्मूलनाकरिता संपूर्ण शहरात डास फवारणी करा,या मागणीसाठी आज भाजपचे प्रवक्ते संजू शिरोडकर यांनी मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना निवेदन दिले.याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धी पत्रातून दिली आहे.श्री.शिरोडकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे,सावंतवाडी शहरात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात वाढले असून,याचा त्रास सर्वसामान्य नागरिक,विद्यार्थी व महिलांना होत आहे.संबंधित भटके कुत्रे उद्यानांमध्ये फुटपाथवर मोठ्या प्रमाणात वावरतात,त्यामुळे सकाळ-संध्याकाळ मॉर्निंग ऑक करणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत आहे.हे कुत्रे काही वेळा लोकांच्या अंगावर धावून येतात,उद्यानामध्ये मुलांच्या मागे लागतात,गाड्या चालवणाऱ्या वाहनचालकांच्या तसेच महिलावर्गाच्या गाड्या मागे हे भटके कुत्रे आल्याने दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाणही वाढत चालले आहे.शहरातील बहुतांशी मोकळ्या जागेत हे कुत्रे ठाण मांडून बसत असल्यामुळे त्या परिसरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .त्यामुळे नगरपालिकेकडून योग्य ती दक्षता घेणे गरजेचे आहे.तसेच सावंतवाडी शहरात दिवसेंदिवस डासांचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे.या डासांमुळे तापसरीचे व साथीच्या रोगांचे रुग्ण वाढत आहेत.मात्र डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत.हे डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ शहरात डास फवारणी करा,अशी मागणी त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

1

4