ओरोस ता.२७:
४६ व्या कोकण परिक्षेत्रीय क्रिडा स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी सहभागी पाचही जिल्ह्यांना समिश्र यश मिळाले. येथील पोलिस ग्राउंड व जिल्हा क्रीडा संकुल येथे 25 नोव्हेंबर पासून या स्पर्धा सुरु झाल्या आहेत. कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, नवी मुंबई, ठाणे ग्रामीण या सहा जिल्ह्यातील पोलिस सुमारे 800 खेळाडू यात सहभागी झाले असून याचे यजमान पद यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभले आहे.
४०० मिटर धावणे मध्ये रायगडच्या नितीन पाटील याने ५१.७० सेकंद मध्ये पुर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. ५००० मिटर धावणे प्रकारात मनिलाल गावित, नवी मुंबई याने १८.१६ सेकंद मध्ये पुर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला. गोळाफेक मध्ये सचिन थितमे, ठाणे ग्रामिण मध्ये तर हातोडा फेक मध्ये हेमराज ढिवरे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. दुसऱ्या दिवशी पुरुष अथलॅटिक क्रिडा प्रकारात उंचउडी मध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील सिद्धेश चिपकर याने १.५५ मिटर उंचउडी मारून प्रथम क्रमांक तसेच रायगडच्या
रितेश यादव याने द्वीतीय क्रमांक पटकावला.
महिला विभागात ४०० मिटर धावणे मध्ये अमृता वडाम, रत्नागिरी हिने १.०७.०५ सेकंदामध्ये पुर्ण
करून प्रथम क्रमांक पटकावला. ५००० मिटर धावणे कविता आडळ पालघर हिने २३.०१ मध्ये पुर्ण करून
प्रथम क्रमांक पटकावला , उंचउडी मध्ये शितल पिंजरे, रत्नागिरी हिने १.५५ मिटर उंचउडी मारून प्रथम क्रमांक
पटकावला. रत्नागिरीच्या तेजस्वीनी जाधव हिने ८.६९ मिटर गोळाफेक करून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच
४ बाय १०० मिटर रिले मध्ये रत्नागिरी जिल्हयाने ५४.२० सेकंद मध्ये पुर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला.
सांघिक स्पर्धेत पुरुष विभागात फुटबॉल मध्ये सिंधुदुर्ग, नवी मुंबई,रत्नागिरी यांनी विजय मिळवला.
हॉकी मध्ये सिंधुदुर्ग, नवी मुंबई, रत्नागिरी तर खोखो मध्ये रायगड, पालघर , नवी मुंबई यांनी विजय मिळवले.
हॅण्डबॉल मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नवी मुंबई यांनी विजय मिळवले.
सांघीक महिला विभागात हॉलीबॉल मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी , रायगड, बास्केटबॉल मध्ये सिंधुदुर्ग
रत्नागिरी , नवी मुंबई, खोखो मध्ये सिंधुदुर्ग, रायगड, नवी मुंबई यांनी विजय मिळवले.
सर्व विजयी संघ व खेळाडूंचे जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील यांनी अभिनंदन केले आहे.