सिंधुदुर्गातील शंभर विद्यार्थी गोवा राज्याच्या शैक्षणिक सहलीवर….

2

समग्र शिक्षा योजनेतून दहा शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड….

ओरोस ता.२७:

शालेय विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने सातत्याने विविध उपक्रम राबवित त्यांची गुणवत्ता त्यांची बुद्धिमत्ता वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. दरवर्षी इस्त्रो सहलीचे आयोजन करून शैक्षणिक प्रगतीसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे.आता समग्र शिक्षा योजनेतून निवड झालेल्या दहा शाळांमधील शंभर विद्यार्थी गोवा राज्याच्या शैक्षणिक सहलीवर जात आहेत.यात सहभागी झालेल्या या विद्यार्थ्यांनी नुसती सहल म्हणून आनंद घेण्याबरोबरच अभ्यास दौरा म्हणून लक्ष द्यावे. अशा मिळालेल्या संधीतून त्यानी आपली गुणवत्ता वाढवावी व शैक्षणिक प्रगती करावी. अशा संधीतूनच आपण या जिल्ह्यात अधिकारी म्हणून येण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन जि
च्या अध्यक्षा संजना सावंत यांनी केले.
समग्र शिक्षा अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार अभियान यातून परराज्यात जाणारी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची शैक्षणिक सहल बुधवारी जिल्हा परिषद भवनाकडून सकाळी गोवा राज्यात रवाना झाली. तत्पूर्वी अध्यक्षा संजना सावंत यांनी खास उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षण सभापती डॉ अनिशा दळवी, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, महिला व बालकल्याण सभापती पल्लवी राऊळ, शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सर्व शिक्षण विभागाच्या प्रमुख स्मिता नलावडे आदी उपस्थित होत्या. जिल्हा परिषदमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात शुभेच्छांचा कार्यक्रम संपल्यानंतर लागलीच दोन बसमधून शंभर विद्यार्थ्यांची सहल गोव्याकडे रवाना झाली. तत्पूर्वी जिल्हा परिषद कडून या १०० विद्यार्थ्यांना ओळ्खपत्र, टी शर्ट, व टोपी देण्यात आली.

3

4