Tuesday, February 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याआम्ही अग्निपरिक्षेस तयार...

आम्ही अग्निपरिक्षेस तयार…

हिंमत असेल तर न्यायालयात जावे नितीन वाळकेंचा विरोधकांना इशारा ; शिवसेना नगराध्यक्ष, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी…

मालवण, ता. २७ :

विरोधकांनी तथाकथित स्टिंग ऑपरेशन करत केलेले फुटकळ आरोप हे वैफल्याचे प्रतिक आहे. यात लपवाछपवीचे काहीही नाही. आम्ही अग्निपरीक्षेस तयार आहोत. शिवसेना नगराध्यक्ष आणि कर्मचार्‍यांशी पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे असा इशारा नगरसेवक नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान ज्या भ्रष्टाचार्‍यांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली त्यांनी नगराध्यक्षांवर आरोप करणे म्हणजे हा शहरवासियांचा अपमान आहे. नगराध्यक्षांवरील भ्रष्टाचाराचे आरोप त्यांनी सिद्ध करावेत असे आव्हान तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी दिला.
विरोधकांनी जी व्हिडीओ क्लिप व ऑडीओ सादर केला तो अर्धवट आहे. ती ऑडीओ क्लिप संपूर्ण ऐकली तर सर्वांची नावे समोर येतील. विरोधकांनी संबंधितांवर दडपण आणून हे षडयंत्र रचले आहे. सत्याची चाड असेल तर हे प्रकरण मिटविण्यासाठी का फोन करत आहेत याचे उत्तरही त्यांनी द्यावे. या सर्व गोष्टींची उत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी न्यायालयात जावे असे श्री. वाळके यांनी सांगितले.
फायर स्टेशनचे काम करणारा ठेकेदार यांच्याचमुळे काम अर्धवट टाकून पळाला. आपल्या भल्याचा विचार करणारे हे नगरसेवक सध्या अल्पमतात आले आहेत. पालिकेच्या विविध प्रकल्पांची यांनीच वाट लावली आहे. ज्या अनधिकृत बांधकामाविरोधात ते बोलत होते ते आता गप्प का असा प्रश्‍न मंदार केणी यांनी उपस्थित केला. गणेश कुशे यांनी आपले सभासदत्व टिकविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यांचे आव्हान स्विकारण्यास आम्ही तयार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष हे स्वच्छ चारित्र्याचे असल्यानेच त्यांना जनतेने निवडून दिले आहे. येत्या काळातही त्यांच्याकडून असाच स्वच्छ व पारदर्शक कारभार सुरू राहील असे बबन शिंदे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments