Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यारानडुकरांच्या शिकार प्रकरणी दोन संशयित ताब्यात ; वन विभागाची कारवाई...

रानडुकरांच्या शिकार प्रकरणी दोन संशयित ताब्यात ; वन विभागाची कारवाई…

संशयितांना न्यायालयात हजर करणार ; व्हिडीओ सोशल मीडियावर टाकणे आले अंगलट…

मालवण, ता. २८ : तालुक्यातील एका गावात रानडुकरांची शिकार करून त्याच्या मटणाचे भाग करताना व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून याची गंभीर दखल आज वनविभागाने घेत दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यात अनेकांचा सहभाग असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेले दोन दिवस रानडुकराची शिकार करून त्याच्या मटणाचे भाग केले जात असल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर फिरत असल्याचे दिसून आले. याची कोणतीही तक्रार झालेली नाही. मात्र वनविभागाने याची गंभीर दखल घेत नाना नेरकर, सुरेश मापारी या दोन संशयितांना आज पहाटेच राहत्या घरातून ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना येथील न्यायालयात हजर केले जाणार आहे. प्रत्यक्षात त्या व्हिडीओमध्ये अनेकांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रानडुकरांच्या शिकारीचा बनविलेला व्हिडीओ त्यांच्याच अंगलट आला असल्याचे बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments