वेंगुर्ल्यातील तीनशे लोकांनी घेतले नारळावर चढण्याचे प्रशिक्षण

324
2
Google search engine
Google search engine
Google search engine

परब यांचा पुढाकार; प्रशिक्षणार्थींना शिडीसह दोन लाखाच्या विम्याचे वाटप

वेंगुर्ले.ता.२८:  कोकणातील हवामान नारळ शेतीसाठी अत्यंत पूरक आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मोकळ्या जागेत नारळाची लागवड केल्यास त्यातून शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळू शकते. मात्र या नारळाच्या झाडावर चढणारे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने नारळ बागायतदारांसमोर समस्या निर्माण झाली आहे. आमच्या संस्थेच्या वतीने आधुनिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात ३०० पेक्षा अधिक जणांनी प्रशिक्षण घेऊन नारळाच्या झाडावर चढण्याच्या समस्येवर मात केली आहे. त्यामुळे अशा प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपले हित करून घ्यावे असे आवाहन महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या संचालिका प्रज्ञा परब यांनी केले.

वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या औद्योगिक सहकारी संस्था कॅम्प येथे ६ दिवसीय नारळाच्या झाडावर चढण्याचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला. या प्रशिक्षणार्थ्यांना नारळ झाडावर चढण्यासाठी शिडी वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सौ. परब बोलत होत्या. यावेळी कृषिभूषण एम. के गावडे, नितीन कुबल, सत्यवान साटेलकर, डॉ संजीव लिंगवत, प्रशिक्षक श्रुती रेडकर आदी उपस्थित होते. या ६ दिवस चालणाऱ्या प्रशिक्षणात २० जणांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणात नारळाच्या जाती, नारळ लागवडीची पद्धत, नारळ खत व्यवस्थापन तसेच नारळावरील विविध रोगांची माहिती याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणार्थ्यांना २ लाख रुपयांचा विमा व नारळावर चढण्याची शिड्यांचे वाटप कृषिभूषण एम. के गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सत्यवान साटेलकर यांनी मानले.

\