भाजपाचे उमेदवार अक्रम खान यांनी केला प्रचाराचा शुभारंभ……

373
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मान्यवरांची उपस्थिती ; बांदेश्वर व भूमिका चरणी श्रीफळ अर्पण…..

बांदा ता.२८:
बांदा सरपंचपद पोटनिवडणुकीत येथील भाजपचे अधिकृत उमेदवार असलेले अक्रम खान यांनी येथील आराध्य दैवत असलेल्या श्री देव बांदेश्वर-भूमिका देवी मंदिरात श्रीफळ ठेवून आज प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी बांद्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खान यांचा विजय निश्चित असल्याचे संजू परब यांनी सांगितले.
शहरात भाजप बरोबरच नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची मोठी ताकद आहे. स्वाभिमान भाजपमध्ये विलीन झाल्याने याचा फायदा अक्रम खान यांना मिळणार आहे.
सायंकाळी उशिरा श्री बांदेश्वर व भूमिका मंदिरात नारळ ठेवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपा नेते संजू परब, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्यामकांत काणेकर, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, माजी सरपंच मंदार कल्याणकर, शहर अध्यक्ष राजा सावंत, केदार कणबर्गी, ग्रामपंचायत सदस्य उमांगी मयेकर, किशोरी बांदेकर, श्यामकांत मांजरेकर, हर्षद कामत, अनुजा सातार्डेकर, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, नितेश पेडणेकर, अन्वर खान, गौरंग शेर्लेकर, बाबा काणेकर, साई धारगळकर, राजाराम सावंत, स्वप्नील सावंत, दीपक सावंत, सुनील राऊळ, पुरुषोत्तम पेडणेकर, प्रवीण नाटेकर, सुभाष मोर्ये, सुनील नाईक, सिद्धेश पावसकर, सुनील धामापूरकर, सुनील राऊळ, गजानन गायतोंडे, सचिन वीर, आबा धारगळकर, दादू कवीटकर, सचिन नाटेकर, हुसेन मकानदार, अरुण देसाई, समीर कल्याणकर, अशोक सावंत, सुधीर शिरसाट, मधुकर देसाई, संतोष सावंत, जीवबा वीर आदींसह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\