किक बॉक्सिग स्पर्धेत चिन्मय नाईक प्रथम : राज्यस्तरावर निवड…..

118
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.२८

पब्लिक स्कूल आंबोली येथे २३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय विभागीय स्पर्धेत १७ वर्षीय वयोगट किक बॉक्सिंग स्पर्धेत कुडाळ कॉलेजचा ११ वी शास्त्र विषयाचा विद्यार्थी कु.चिन्मय सिताराम नाईक यांची शालेय विभागीय क्रिडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. कु. चिन्मय याची राज्यस्तरावर निवड झाली आहे.
चिन्मय याला कराटे शिक्षक पुंडलिक हळदणकर, कुडाळ कॉलेजचे क्रीडा शिक्षक वैभव कोंडस्कर, सर्व शिक्षकवर्ग, प्राचार्य श्री. वालावलकर व प्राथमिक शिक्षक सिताराम नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

\