शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ…

899
2
Google search engine
Google search engine
Google search engine

भुजबळ,शिंदे,राऊत,देसाई यांच्यासह सहा मंत्री शपथबध्द: शिवतीर्थावर अलोट गर्दी…

मुंबई/अजित जाधव ता. २८:
महाराष्ट्र राज्याचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख तथा महाविकास आघाडीचे नेते श्री उद्धव ठाकरे यांनी आज आपली शपथ घेतली.त्यांच्यासमवेत शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली,यावेळी मुख्यमंत्र्यांचा सहा जण शपथबद्ध झाले आहे.
हा शपथविधी याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा शपथ विधी पूर्ण झाला. दरम्यान या सोहळ्यासाठी शरद पवार,मनोहर जोशी,सुशीलकुमार शिंदे,अशोक चव्हाण,देवेंद्र फडणवीस,राज ठाकरे,माणिकराव ठाकरे आदी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

\