शपथविधी सोहळ्याचा कणकवलीतहि जल्लोष….

344
2
Google search engine
Google search engine
Google search engine

शहरातून काढली रॅली, थेटप्रेक्षपण व्दारे अनुभवला सोहळा…..

कणकवली, ता.२८ : 
राज्याचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे गुरुवारी शिवतीर्थावर  शपथ घेणार तदपूर्वी कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना कार्यालया येथून शहरात मोटार सायकल रॅली काढली. तब्बल २० वर्षा नंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने महाविकास आघाडीच्या वतीने घोषणाबाजी व पटवर्धन चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.तसेच चौकात एलईडी व्दारे पूर्ण शपतविधिचे थेट प्रेक्षपण दाखिण्यात आले.
                 महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शपथ घेताच घोषणाबाजी फटाके फोडत व उपस्थितांना मिठाई वाटत  आनंदोत्सव साजरा केला.तद्नंतर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे,सुभाष देसाई,राष्ट्रवादी कडून जयंत पाटील,छगनभुजबळ तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात व डॉ.नितीन राऊळ यांनी शपथ घेतली.
        कणकवली शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून पटवर्धन चौक- बाजरपेठ मार्गे – भालचंद्र महाराज संस्थान रोड- पटकीदेवी – बाजरपेठ तेलीआळी मार्गे पुन्हा वटवर्धन चौकात  रॅलीची सांगता झाली.
    या रॅलीत शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये,कँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेंद्र सावंत,राजेंद्र पेडणेकर,महानंदा चव्हाण,नगरसेवक सुशांत नाईक,कन्हैया पारकर,रुपेश नार्वेकर,महिला प्रमुख नीलम पालव,संजना कोलते,वैद्यही गुडेकर,स्वरूपा विखाळे,अँड.हर्षद गावडे,शेखर राणे,संदेश पटेल,सोमा गायकवाड,रुपेश जाधव,शिवसेना- काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
————————————————————–
          जल्लोषापासून राष्ट्रवादी अलिप्त
बॉक्स – शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेण्यापूर्वी कणकवली शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. मात्र या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही पदाधिकारी अथवा कार्यकर्ता सहभागी झाला नव्हता.
\