वेंगुर्ल्यात उद्या आंतरमहाविद्यालयीन हॉलीबॉली स्पर्धा…..

115
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले : ता.२९

शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूर संचलित बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला तर्फे उद्या शनिवार ३० नोव्हेंबर रोजी मुंबई विद्यापिठ आंतरमहाविद्यालयीन हॉलीबॉल स्पर्धा २०१९ सिधुदुर्ग व रत्नागिरी झोन ५ चे वेंगुर्ले येथे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील स्पर्धा बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर ३० रोजी सकाळी ९ वाजता सुरु होणार आहे. या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर, सावर्डे, कणकवली, साळगांव, फोंडाघाट, आचरा, वेंगुर्ला, सावंतताडी, चिपळुण, रत्नागिरी, दापोली, रावराणे व हेगशेटये आदी कॉलेजचे संघ सहभागी होणार आहेत.

\