Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
निमित्त वेतोबा जत्रोत्सवाचे; गावधडवाडी मित्रमंडळाचा आदर्श उपक्रम…
वेंगुर्ला : ता.३०
अवकाळी पावसामुळे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. राज्यात सरकार स्थापनेस विलंब झाल्याने शासनाकडूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. याची दखल घेत सिधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावातील गावधडवाडी मित्रमंडळाने श्री वेतोबा जत्रेचे औचित्य साधून गावधडवाडी मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या रोख रक्कमेचे वाटप करण्यात आले.
यापूर्वीही गावधडवाडी मित्रमंडळाने आरवली विकास मंडळ यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर घेऊन ४४० रुग्णांची सोनोग्राफी, एक्सरे, इ.सी.जी. तपासणी तसेच चष्मे वाटपही केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेल्या आर्थिक सहाय्यबाबत गावधडवाडी मित्रमंडळाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाला गावधडवाडी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Download WordPress Themes Nulled and plugins.