चौकशी समितीत उघड; मंदिर संस्थानच्या अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यावर संशय…
तुळजापूर ता.३०:
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या तुळजापूर मधील श्री देवी तुळजाभवानीच्या मंदिरातील दागिने गायब झाल्याचा प्रकार घडला आहे.या मौल्यवान माणिक,चांदीचे दोन खडाव आणि विविध राजांनी राजवाड्याकडुन दिलेली ७१ पुरातन नाण्यांचा यात समावेश आहे.विशेष म्हणजे या चोरीत संस्थांचे काही अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय आहे.
याबाबतचा अहवाल चौकशी समितीकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि विधिमंडळाकडे देण्यात आला आहे.मंदिराचे पुजारी किशोर गंगणे आणि त्यांचे वकील शिरीष कुलकर्णी यांनी मंदिरात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराबाबत तक्रारी केल्या होत्या.त्या अहवालानुसार हा सर्व प्रकार उघड झाला आहे.मंदिराच्या खजिन्याच्या एकूण अकरा चाव्या होत्या.त्यातील ३ चाव्या हरवल्याचा दावा करण्यात आला आहे.देवीच्या अंगावरील दागिने ठेवण्यासाठी पाच पेट्या आहेत.त्यातील चौथ्या पेटीत अकरा गेल्याची नोंद होते. गायब झालेल्या वस्तूत दागिनेसह खडावा व नाण्यांचा समावेश आहे.चोरीप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात यावी,अशी शिफारस जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात करण्यात आली आहे.