वैभववाडी बाजारपेठेत चोरट्याचा मोबाईल शॉपीवर डल्ला…

229
2
Google search engine
Google search engine
Google search engine

लाखाचा मुद्देमाल लंपास; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू…..

वैभववाडी ता.३०: 
     जिल्ह्यात चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. दिवसा ढवळ्या चोऱ्या होत असून नागरिकांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वैभववाडी बाजारपेठेतील हॕलो मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख रुपये किमतीचे मोबाईल चोरून पोबारा केला. ही घटना शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळी या दरम्यान घडली आहे. याबाबत मोबाईल शॉपी मालक इम्पीयाज इक्बाल काझी वय २९ वर्षे रा. तिथवली यांने वैभववाडी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसात रात्री उशिरापर्यंत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.
     वैभववाडी बाजारपेठेत काझी यांचे वैभववाडी बसस्थानक शेजारी हॅलो मोबाईल शॉपी असून बुधवारी सायंकाळी उशिरा नेहमीप्रमाणे मोबाईल शॉपी बंद करून तो घरी गेला वैभववाडी बाजारपेठेत गुरुवार अर्धा दिवस सुरस असल्याने त्याने इतर कामासाठी बाहेर गावी गेला होता तर शुक्रवारी त्याची मोबाईल शॉपी पूर्ण दिवस बंद असल्याने तो आला नव्हता शनिवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे पुढील बाजू मोबाईल शॉपी उघडून आत प्रवेश केला असता त्याला अस्ताव्यस्त सामान असायचे काढले दुकानाच्या मागील बाजूस पाहिले असता चोरट्याने मोबाईल शॉपी चा मागील पत्रा तोडून आत प्रवेश करून शॉपी मधील किमती मोबाईल चार्जर घेऊन लंपास झाल्याचे आढळले या या घटनेमुळे या घटनेमुळे इम्तियाज कधी चांगलाच हादरला असून दुरुस्तीसाठी आलेले मोबाईल ही चोरी झाल्याचे त्याने सांगितले या चोरीचा घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये उशिरापर्यंत सुरू होती.
\