मळगाव येथून परप्रांतीय कामगार बेपत्ता…

236
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.०१; येथील रेल्वे स्टेशन परिसरात भंगार गोळा करण्याचे काम करणारा परप्रांतीय युवक २७ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.रामविलास जल्लूप्रसाद निसाद (२२) सध्या रा.कुडाळ,मूळ रा.उत्तरप्रदेश असे त्याचे नाव आहे.याबाबतची खबर त्याचा भाऊ औवदेशकुमार जल्लूप्रसाद निसाद याने आज सावंतवाडी पोलिस ठाण्यात दिली.त्यानुसार येथील पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,बेपत्ता युवक रेल्वेस्टेशन परिसरात भंगार गोळा करण्याचे काम करत होता.दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी तो सकाळी आपल्या साथीदारांसह रोजच्याप्रमाणे कामावर गेला होता.दरम्यान सायंकाळी कुडाळ येथे घरी परतत असताना,सोबत असलेल्या एका कामगाराशी त्याची शाब्दिक बाचाबाची झाली.या रागातून तो बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या भावाने दिली आहे.

\