पोलिस क्रीडा स्पर्धेत नवी मुंबईला जेतेपद…

145
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गचा राहुल काळे, रत्नागिरीची मंजरी रेवाळे मालिकावीर…

ओरोस ता.०१: येथील पोलिस क्रीडा मैदान व जिल्हा क्रीडा संकुल येथे २५ नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या ४६ व्या कोकण परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवार सायंकाळी पोलिस ग्राउंड येथे कोकण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक निकेत कौशिक यांच्या उपस्थितीत झाला.यावेळी नवी मुंबई जिल्ह्याला सर्वसाधारण जेतेपद देवून सन्मानीत करण्यात आले. तर सिंधुदुर्गचा राहुल काळे याला पुरुष गटात व महिला गटात रत्नागिरीची मंजरी रेवाळे हिला मालिकावीर म्हणून एलसीडी टीव्ही देवून गौरविण्यात आले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम, रायगड पोलिस अधीक्षक अनिल पारसकर, पालघर पोलिस अधीक्षक गौरव सिंग, ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड, नवी मुंबई पोलिस उपायुक्त शिवाजी पाटील, जिल्हा अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील, जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निकेत कौशिक यांच्या समोर महिला व पुरुष गटासाठी 100 मीटर धावणे स्पर्धा घेण्यात आली. यानंतर येथील डॉन बॉस्कोच्या मुलांनी एक कोळी नृत्य सादर केले. यावेळी पोलिस कुटुंबियांच्या मुलांसाठी 50 मीटर धावणे तर 25 मीटर लांबीची बेंडूक उड्या स्पर्धा घेण्यात आली. तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना कौशिक यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तसेच पोलिस अधिकारी विरुद्ध पत्रकार व निमंत्रित यांच्यात रस्सीखेच स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पत्रकार व निमंत्रित संघाने दोन्ही फेऱ्या जिंकल्या.

\