सावंतवाडी बस स्थानक परिसरात आढळला अज्ञात मृतदेह….

1070
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०२: येथील वेंगुर्ला (खालच्या) बस स्थानक परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे.ती व्यक्ती पडल्यामुळे गंभीर झाली होती.यातच रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

ही घटना काल रात्री उशिरा घडली. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस सहाय्यक निरीक्षक योगेश जाधव, राजेश गवस व अन्य सहकारी त्या ठिकाणी धाव घेतली.मात्र संबंधित मृताची ओळख पटवण्यात अपयश आल्याचे समजते. संबंधित व्यक्ती हा काल सायंकाळी बसस्थानक परिसरातील दत्त मंदिर कडे बसला होता मात्र तेथून तो जाण्यासाठी वेंगुर्ले बस स्थानक परिसरात जात असताना पडला व त्यात त्याला दुखापत झाली असावी.असे येथील काही लोकांचे म्हणणे आहे.

\