चिवला बीच समुद्रात दिल्लीतील महिला पर्यटक बुडाली…

594
2
Google search engine
Google search engine

प्रकृती गंभीर ; खासगी रुग्णालयात उपचार सुरू…

मालवण, ता. २ :

शहरातील चिवला बीच येथील समुद्रात पर्यटनाचा आनंद लुटण्यास आलेल्या दिल्लीतील पर्यटकांपैकी कोमल गर्ग वय ४३ ही महिला पर्यटक बुडल्याची घटना घडली आहे. तिची प्रकृती गंभीर असून तिला तत्काळ अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दिल्लीतील पर्यटकांचा एक समूह आज चिवला बीच येथील समुद्रकिनारी पर्यटनाचा आंनद लुटण्यास आला होता. यात महिला व पुरुष पर्यटकांचा समावेश होता. दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान समुद्रात उतरलेल्या कोमल गर्ग या अचानक पाण्यात बुडू लागल्या. हा प्रकार लक्षात येताच स्थानिकांनी त्यांना तत्काळ बाहेर काढून अधिक उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविले. पोटात भरपूर पाणी गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.