सावंतवाडीचे नगराध्यक्ष पदाची पोटनिवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार….

2

आजच्या बैठकीत निर्णय;पक्ष संघटना बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार….

सावंतवाडी ता.०२ :
आगामी काळात होणारी सावंतवाडी नगराध्यक्षांची पोटनिवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय आज येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान आता सत्तेत काँग्रेस पक्ष असल्यामुळे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावेत,असे आवाहन यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या सभागृहात आज पक्षाची बैठक झाली.
यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष दिलीप नार्वेकर, राजू मसुरकर, बाळा गावडे,राघू नार्वेकर, महेंद्र सांगेलकर, रवींद्र म्हापसेकर,बाबल्या दुभाषी,साक्षी वंजारी,व्हीक्टर डान्टस,ग्रेगरी डान्टस आदी पदाधिकारी उपस्थित होते.

3

4