प्राजक्ता माळकर हीला सन्मान;बडोदा गुजरात येथे होणार कोचिंग कोर्स….
वेंगुर्ले : ता.२
जगात पहिल्यांदाच गुजरात येथे होत असलेल्या दिव्यांग महिला क्रिकेट कोचिगसाठी भारताच्या संघात तुळस गावाच्या सुकन्या प्राजक्ता माळकर हिची निवड करण्यात आली आहे.
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने व बदोडा डिसेबल क्रिकेट असोसिएशन यांच्या मार्फत १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत बडोदा-गुजरात येथे दिव्यांग क्रिकेट कोचिग कोर्स आयोजित केला होता. या कोर्समध्ये वेंगुर्ला येथील साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे सानिया नेकनाळ व प्राजक्ता माळकर सहभागी झाल्या होत्या. यात तुळस गावची प्राजक्ता माळकर हिची दिव्यांग महिला क्रिकेटसाठी भारताच्या संघामध्ये निवड झाली आहे. तर सानिया नेकनाळ हिने कोचिग कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. दोघींच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही मिळत आहेत.