नितेश राणे यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद….

2

नाणार प्रकल्पग्रस्तांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश…

मुंबई ता ०२ :
आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आवाहनाला नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नाणार विरोधी प्रकल्पग्रस्तांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत
दोन दिवसापूर्वी आरे येथील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर त्या ठीकाणी आंदोलन करणा-या आंदोलकांवर गुन्हे मागे घेण्याचे आदेश श्री ठाकरे यांनी दिले होते यानंतर आमदार राणेंनी नाणार प्रकल्पातील आंदोलनाच्या केसेस मागे घ्या. ते आपल्या पर्यावरण आणि हक्कासाठी लढत होते त्यामुळे त्यांच्याविरोधात दाखल असलेले गुन्हे मागे घ्या असे नितेश राणे यांनी ट्विट केले होते दरम्यान त्यांच्या या मागणीला श्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे व गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहे

6

4