जिल्ह्यातील यानंतरच्या सर्व निवडणुका महाविकासआघाडी सोबत

368
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर ; कीतीही गट स्थापन केले तरी जिल्हा परिषद आमच्याच ताब्यात येणार

सावंतवाडी ता.०३:  आगामी काळात जिल्ह्यात होणा-या सर्व निवडणूका महाविकासआघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येतील त्यासाठी संबंधित सर्व जिल्हाध्यक्षांशी मी बोलेन.सावंतवाडीची नगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी,अशी आपली इच्छा आहे.अशी भूमिका पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे मांडली.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महा विकास आघाडीच्या ताब्यात राहणार आहे.त्यामुळे कोणीही कितीही गट स्थापन केले तरी काही होणार नाही. पक्षांतर बंदी कायद्यानुसार ज्या चिन्हावरून निवडून आले त्याच पक्षात राहणे संबंधित सदस्यांना बंधनकारक आहे, अन्यथा ते अपात्र होतील असे केसरकर म्हणाले.
श्री.केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी बाबू कुडतरकर, राजन पोकळे, अण्णा केसरकर, जयेंद्र परुळेकर, विशाल सावंत आदी उपस्थित होते

\