बोर्डवे मशिद मधील फंडपेटीतील रक्कम गायब… ​

128
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.०३: कणकवली तालुक्यातील बोर्डवे-मुस्लीमवाडी येथील जुम्मा मशिद मधील फंडपेटीतील सुमारे तीन हजाराची रक्कम लंपास झाली आहे. कुतुबुद्दीन शेख यांनी या चोरीची फिर्याद येथील पोलिस ठाण्यात आज दिली. यात त्यांनी दोघा जणांवर संशय व्यक्त केला असून त्यांची नावे पोलिसांत दिली आहेत. शेख हे कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. काल (ता.२) सायंकाळी ते मशिदमध्ये आले असता त्यांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला. गेले तीन महिने ही फंडपेटी उघडण्यात आली नव्हती. तसेच या फंडपेटीला कुलूप देखील लावण्यात आले नव्हते.

\